सांगली : तासगाव – कवठेमहांकाळमध्ये आजवर रखडलेला विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, नवे विकासपर्व सुरू करण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार रोहित पाटील यांनी केले. कवठेमहांकाळ येथील प्रचार प्रारंभ प्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी तासगाव कवठेमहांकाळच्या माजी आमदार सुमन पाटील, काँग्रेसच्या शैलजा पाटील, जयसिंग शेंडगे, अनिता सगरे, सुरेश पाटील प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा : Uddhav Thackeray : “संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर…”, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनासाठी उद्धव ठाकरेंचा पोलीस आणि EC ला इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी पाटील म्हणाले, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, द्राक्ष खरेदी – विक्री केंद्र उभारणी, बेदाणा निर्मिती केंद्रामधील आधुनिकीकरण, त्याचबरोबर रखडलेल्या सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपली साथ हवी आहे. स्व. आर. आर. पाटील यांच्या स्वप्नातील अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी आपण मला ताकद द्याल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.