बीड : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये भरधाव कंटेनरने सहा जणांना चिडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हे सहा जण पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनाला जात होते. कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पेंडगाव येथे असलेल्या मारुतीच्या दर्शनासाठी जात होते. नामलगाव येथील उड्डाणपूल ओलांडून ते पुढे असलेल्या जिनिंग जवळ चालत असताना पाठीमागून येत असलेल्या भरधाव कंटेनरने सहाही जणांना चिरडले.

बीड येथील दिनेश दिलीप पवार, पवन शिवाजी जगताप,आकाश अर्जुन कोळसे,अनिकेत रोहिदास शिंदे,किशोर गुलाब तोर,विशाल श्रीकिशन काकडे असे या अपघातातील मृतांची नावे आहेत.दरम्यान बीड ग्रामीण पोलिसांनी कंटेनरच्या दोन चालकांना ताब्यात घेतले आहे.