सांगली : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन संशयित आरोपींना न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
तीनही संशयित आरोपींनी तरुणीला चित्रपट पाहण्यासाठी दुचाकीवरून नेले. यानंतर एका खोलीत शीतपेयातून गुंगीचे औषध दिले व तिच्यावर अत्याचार केले. या तिघांमध्ये दोन तिचे वर्ग मित्र असून, तिसरा मित्र आहे. याबाबत गुरुवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करताच संशयिताना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले असता तिघांना सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव तपास करत आहेत.