अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. परंतु शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत आणि मदतही जाहीर केली जात नाही. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी काही देणंघेणं नाही. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, त्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतातील उभे पीक वाया गेले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई दिली पाहिजे, पण पंचनामे करण्यास कर्मचारीच नाहीत. सरकारी कर्मचारी संपावर आहेत आणि सरकार टाईमपास करत आहे. पंचनामे करण्यास उशीर होत असेल तर सरकारने तातडीने रोख मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करावी, असंही नाना पटोले म्हणालेत.

महाविकास आघाडी सरकार असताना नैसर्गिक संकट आले असता तातडीने १० हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली होती, नंतर पंचनामे करून मोठे पॅकेजही दिले.पण शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव नाही. शेतकरी आत्महत्या दररोज होत आहेत असे विर्ढावलेले विधान या सरकारचे मंत्री करत आहेत. शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती असावी लागते ती या सरकारकडे नाही. दोन दिवसावर गुढी पाडव्याचा सण आहे, हा सण कसा साजरा करायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

Vice President said Today we are in corruption free India
नागपूर : देशातून दलालांची जात संपूर्णपणे नष्ट, उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,‘सरकारी नोकऱ्या…’
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
नियम डावलून २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती? प्रस्तावाविरोधात तीन संघटनांची मुख्य सचिवांकडे तक्रार
controversy over distribution of burkha by shinde group
शिंदे गटाकडून बुरखावाटप केल्याने वाद
Goshalas, Maharashtra, Goshalas subsidy,
राज्यातील १३५ गोशाळांना झाली मोठी मदत; जाणून घ्या, राज्य सरकारने किती गोशाळांना दिले अनुदान
Petitioners against reservation of Maratha society claim in High Court Mumbai news news
मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित; आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा
President rule, Balasaheb Thorat,
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी
Vidya Chavan On Ajit Pawar Devendra Fadnavis
Vidya Chavan On Ajit Pawar : “राज्याचं गृहखातं आता अजित पवारांकडे द्यावं”, शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचं मोठं विधान