छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी आरोपींनी ओलांडलेली क्रौर्याची परिसीमा दर्शवणारी छायाचित्रे सोमवारी सायंकाळी समोर आल्यानंतर अवघं समाजमन हळहळले असून, घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बीड शहरात आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीतील घराबाहेर पोलीस वाढवण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे.

संतोष देशमुख यांची हत्या करतानाची छायाचित्रे पाहून त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा बांध फुटला. मंगळवारी देशमुख यांच्या भेटीसाठी मनोज जरांगे पाटीलही मस्साजोगमध्ये दाखल झाले असून, त्यांनीही तातडीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्या प्रकरणातील दोषारोपपत्रामध्ये तपास यंत्रणेने आरोपींमधील संवाद, संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपी हसत असून, देशमुख यांच्या पार्थिवावर बुटासह उभे राहणे, क्लचवायरने ओढणे, मारहाण करताना छायाचित्रण करणे, अशी छायाचित्रे जोडल्याचे स्पष्ट झाले आहे. ही छायाचित्रे प्रसारित झाली असून, ते पाहून अवघ्ये समाजमन हळहळले. त्यावरून आरोपींबाबत संतापाची लाट पसरली असून, त्याच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.