मागील २४ तासांत महाराष्ट्रात १७ हजार ३२३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत १२ लाख २९ हजार ३३९ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये राज्यात १२ हजार १३४ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ३०२ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६४ टक्के इतका आहे. आजवर पाठवण्यात आलेल्या ७४ लाख ८७ हजार ३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख ६ हजार १८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ३६ हजार ४९१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या राज्यात २३ लाख ५८८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर २४ हजार ९७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात २ लाख ३६ हजार ४९१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात १२ हजार १३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ६ हजार १८ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात १२ लाख २९ हजार ३३९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८१.६३ इतका झाला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
मुंबई- २६ हजार ७२
ठाणे ३१ हजार ७२१
पुणे ५४ हजार १९५
कोल्हापूर ४ हजार ४९५
नाशिक १४ हजार ४०५
अहमदनगर ९ हजार ६२९
औरंगाबाद ९ हजार ६९५
नांदेड ३ हजार ६२८
नागपूर १० हजार ८९९

सध्या महाराष्ट्रातही अनलॉक आणि मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. करोना हॉटस्पॉट वगळता हॉटेल्स आणि रेस्तराँ यांनाही संमती देण्यात आली आहे. तरीही लोकांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी असं आवाहन वारंवार सरकारतर्फे आणि प्रशासनातर्फे करण्यात येतं आहे. गरज असेल तरच बाहेर पडणं, मास्क लावणं, घरी आल्यानंतर हात-पाय आणि तोंड स्वच्छ धुणं यासारखे नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच करोनाची थोडीशी लक्षणं जरी दिसली तरीही त्याकडे दुर्लक्ष करु नका तातडीने कोविड रुग्णालयात जाऊन चाचणी करुन घ्या असंही आवाहन करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Totally 1229339 patients are cured discharged from the hospitals in maharashtra scj
First published on: 09-10-2020 at 21:17 IST