सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात शुक्रवारी सायंकाळी बुडालेल्या पर्यटकांपैकी आणखी दोघांचे मृतदेह आज शनिवारी सापडले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ५ झाली आहे, तर अजूनही दोन पर्यटक बेपत्ता आहेत. ही दुर्घटना काल, शुक्रवारी सायंकाळी घडली होती. वेळागर समुद्रात एकूण ९ पर्यटक बुडाले होते. यातील ७ जण बेळगाव लोंढा येथील होते, तर २ जण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे होते.
शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेले पर्यटक:
समुद्रात बुडालेले पर्यटक ९ होते, आतापर्यंत मिळालेले मृतदेह: ५ सापडले आहेत. त्यातील काल शुक्रवारी ३ मृतदेह सापडले होते.श्रीमती फरहान इरफान कित्तूर, वय ३४, रा. लोंढा, बेळगाव,श्री इबाद इरफान कित्तूर, वय १३, रा. लोंढा, बेळगाव, श्रीमती नमीरा आफताब अख्तर, वय १६, रा. अल्लावर, बेळगाव हे काल सापडले तर
आज शनिवारी २ मृतदेह सापडले,त्यात फरहान मोहम्मद मणियार, वय २५, रा. गुढीपूर, कुडाळ, सिंधुदुर्ग (मृतदेह वेंगुर्ले सागरतीर्थ किनारी सापडला.),इकवान इमरान कित्तूर, वय १५, रा. लोंढा, बेळगाव (मृतदेह वेंगुर्ले मोचेमाड समुद्रकिनारी आढळला.) यांचा समावेश आहे.
या दुर्घटनेत वाचलेल्या दोघांमधील लोकांमध्ये इसरा इम्रान कित्तूर, वय १७, रा. लोंढा, बेळगाव यांचा समावेश आहे. अजून एका व्यक्तीला वाचविण्यात आले होते. तर दुसऱ्या अद्याप २ बेपत्ता आहेत.
बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरु:
दुर्घटना होऊनही अद्याप इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय ३६, रा. लोंढा, बेळगाव) आणि जाकीर निसार मणियार (वय १३, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग) या दोघांचा शोध सुरु आहे.
बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर करण्यात येत असून बोटीद्वारेही शोधमोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. वेळागर समुद्राच्या घटनास्थळी पोलीस, महसूल आणि ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक शोध व बचाव पथकाद्वारे बेपत्ता पर्यटकांचा कसून शोध घेण्यात येत आहे.