शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे गटाने आता वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. त्याची आज रितसर घोषणा करण्यात आली. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली. दरम्यान, युतीच्या घोषणेनंतर आगामी काळात या दोन्ही पक्षांची युती म्हणून वाटचाल कशी असेल यावर त्यांनी ओझरते भाष्य केले आहे.

हेही वाचा >> परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जाणार अंदमान-निकोबारची ‘ही’ २१ बेटे; PM मोदींनी केलं नामकरण; म्हणाले…

“वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्र येण्याचे ठरवले आहे. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल. आज जे काही देशात चालू आहे ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. काल-परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. निवडणुका आल्यानंतर गरिबांचा उदोउदो करायचा. गरिबांनी मतदान केल्यानंतर ते रस्त्यावर येतात. तर दुसरीकडे यांची उड्डाणं चालू होतात. हे सगळं थांबवण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत,” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “नातेवाईकांचं राजकारण वाढल्याने भांडवलशाही आणि लुटारूंची सत्ता…”, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून वंचित आणि ठाकरे गाटाच्या युतीची चर्चा सुरू होती. आमच्यात चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप तशी घोषणा झालेली नाही. या युतीची घोषणा कधी करायची याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील अशी माहिती याआधी प्रकाशा आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यानंतर या नव्या प्रयोगाची घोषणा नेमकी कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यानंतर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून या युतीची घोषणा करण्यात आली.