scorecardresearch

“कुणीतरी आपल्या पत्नीबरोबर वावरतंय याची माहिती फडणवीसांना…”, सुषमा अंधारेंचं गृहमंत्र्यांवर टीकास्र!

सुषमा अंधारे म्हणतात, “भाजपाला जेव्हा सगळ्याच आघाड्यांवर अपयश येतं, तेव्हा तेव्हा भाजपा धर्माच्या आड लपायचा प्रयत्न करते. हे वाईट आहे.”

sushma andhare mocks devendra fadnavis
सुषमा अंधारेंची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या संभाजीनगरमधील सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या सभेच्या पार्श्वभूमीवर रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या हिंसाचारप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत टीव्ही ९ शी बोलताना भाजपावर थेट आरोप केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“हे भाजपाचं गलिच्छ राजकारण”

“संभाजीनगरमध्ये भाजपानं ठरवून मविआच्या सभेत विघ्न आणण्यासाठी अक्षरश: संभाजीनगरच्या जनतेला वेठीस धरलं. जनतेच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न भाजपानं जाणीवपूर्वक केला. सोलापुरात अतुलराजे भंवर नावाच्या एका तरुणानं २०१६ साली त्याच्या कुलदैवताच्या पूजेवेळी एक फोटो काढला होता. तलवार घेऊन काढलेला फोटो त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केला. तो फोट आत्ता उकरून काढून त्याचा संबंध संभाजीनगरशी जोडून त्याला आत्ता अटक केली आहे. हे भाजपाचं गलिच्छ राजकारण आहे”, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

“भाजपा धर्माच्या आड लपण्याचा प्रयत्न करतं”

“भाजपानंच हे सगळं कारस्थान घडवून आणलं आहे. भाजपाला जेव्हा सगळ्याच आघाड्यांवर अपयश येतं, तेव्हा तेव्हा भाजपा धर्माच्या आड लपायचा प्रयत्न करते. हे वाईट आहे. राम नवमीचं पावन पर्व चालू असताना, रमजानचा महत्त्वाचा महिना चालू असताना अशावेळी सत्ताधाऱ्यांनी प्रामुख्याने धार्मिक सलोखा ठेवणं गरजेचं असतं. पण सत्ताधारीच लोकांच्या जीवाशी खेळत असतील, तर न्याय कुठे मागायचा?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

“एकनाथ शिंदे गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का?” संजय राऊतांचा खोचक सवाल; म्हणाले, “आधी मिंधे गटानं…”

दरम्यान, यावेळी सुषमा अंधारेंनी अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल केलं गेल्याच्या प्रकरणाचाही उल्लेख करत फडणवीसांना लक्ष्य केलं. “देवेंद्र फडणवीसांची गृहमंत्री म्हणून पकड ढिली आहे हे सातत्यानं लक्षात येतंय. त्यांच्या पत्नीबाबतच हेरगिरी होत आहे. २०१६पासून कुणीतरी आपल्या पत्नीसोबत वावरतंय, याचा पत्ता त्यांना गृहमंत्री असतानाही लागत नसेल, तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

“उद्धव ठाकरेंनी आज सभेत सांगावं की गडाखांना मंत्रीपद का दिलं?” खोक्यांचा उल्लेख करत शिंदे गटाचं आव्हान!

“जर त्यांच्या हे लक्षातच येत नसेल की एकीकडे तुम्ही शीतल म्हात्रे प्रकरणात ध चा मा करून लोकांना अटक करता, पण तीच घटना सुषमा अंधारे यांच्या बाबतीत घडते, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यापासून सगळे सांगत असतानाही हे दखल घेत नाहीत. एका डान्स बारमध्ये गणेश बिडकर नाचताना दिसत आहेत. आम्ही तो व्हिडीओ बघितलेला नाही. ते त्या डान्स बारमध्ये ध्यान धारणेला गेले असतील, पूजेला गेले असतील, त्यांचं काय असेल ते असेल. पण त्यावरून कारण नसताना एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप कॉलवरून खंडणी मागितली म्हणून अटक होते”, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 13:46 IST

संबंधित बातम्या