पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये बोलताना म्हणाले, ‘शरद पवारांनी कृषिमंत्री असताना काय केलं?’ पण, शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटींची कर्जमाफी केली. मात्र, आजपर्यंत काहीच झालं नाही. मी आल्यावरच सर्व झालंय, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. लोक एवढी मुर्ख नाहीत, अशा शब्दांत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी खासदार अनंत गीते, मुस्ताक अंतुले उपस्थित होते.

हेही वाचा : “पंतप्रधानांनी शरद पवारांवर ‘ते’ वक्तव्य करूनही अजित पवार शांत बसत असतील, तर…”, रोहित पवारांचं वक्तव्य

उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींच्या घोटळ्याबाबत टीका केली होती. मग, काल का केली नाही? बाजूला कोण बसलं होतं? हे सर्व थोतांड चालू आहे.”

“आताचं समीकरण, हे ‘मी’करणकडे चाललं आहे. सगळं काही मीच. माझ्याशिवाय कुणीच नाही. पंतप्रधान शिर्डीत आल्यावर आरक्षणाच्या प्रश्नावर बोलतील, असं वाटलं होतं. पण, काहीच बोलले नाहीत, हे त्यांचं वैशिष्ट आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोक रस्त्यावर उतरले असून आत्महत्या करत आहेत. पण, जणू मी त्या गावचाच नाही, असं करून बोलून जायचं,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर केला आहे.

हेही वाचा : “एकतर अजित पवारांनी…”, मोदींच्या शरद पवारांवरील टीकेवर अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवसेना आणि शेकापमध्ये मारामाऱ्या झाल्या आहेत. एवढ्या वर्षानंतर आम्ही एका व्यासपीठावर येऊ शकलो. कारण, तेव्हाच्या मारमाऱ्या हा व्यक्तीगत विरोध नव्हता. सुडाचं राजकारण कधीच कुणी केलं नाही. बाळासाहेब आणि ए. आर. अंतुले यांची मैत्री उघड होती. पण, मते पटली नाही, तर विरोध करण्यात येत होता. आताच्या राजकारणात विरोधकांना आणि मित्रालाही संपवलं जात आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.