शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मनसेच्या कार्यकर्त्याने दिल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रारदेखील केली आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर वसंत मोरे यांनी आता मनसेच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले वसंत मोरे?

“मी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हापासून मला धमकीचे फोन येत आहेत. हा फोन मला १५ दिवसांपूर्वी आला होता. या व्यक्तीने मला तीन ते चार वेगवेगळ्या नंबरवरून फोन केले होते. फोन केल्यानंतर तो मला थेट शिवीगाळ करत होता. तसेच मी मनसेचा कार्यकर्ता आहे, असं सांगत होता. त्यावेळी मी माझा भाचा प्रतिकला फोन करून याची माहिती दिली. त्याने त्या व्यक्तीला फोन केला तेव्हा त्यालाही शिवीगाळ करण्यात आली”, असं वसंत मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा – “मनसेच्या कार्यकर्त्याकडून मला जीवे मारण्याची धमकी”, ऑडियो क्लिप शेअर करत वसंत मोरेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “मी पुन्हा…”

“माझा ठाकरे गटातील प्रवेश रोखण्याचा प्रयत्न”

“सुरुवातीला आम्ही हा प्रकाराकडे दुर्लक्ष केलं. याबाबत तक्रार केली नाही. मात्र, त्यानंतर हा प्रकार वाढत गेला. माझ्या सोशल मीडिया खात्यावरही अशाप्रकारे धमक्या मिळत होत्या. ज्यादिवशी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यादिवशी सु्द्धा माझ्या मुलाला आणि इतर काही कार्यकर्त्यांना धमकीचे फोन आले. त्यांना शिवीगाळ करण्यात आली, एकंदरिताच माझा ठाकरे गटातील प्रवेश रोखण्यासाठी ही योजना होती, हे माझ्या लक्षात आलं”, असंही वसंत मोरे म्हणाले.

साईनाथ बाबर यांच्यावर गंभीर आरोप

पुढे बोलताना त्यांनी मनसेचे नेते साईनाथ बाबर यांच्यावर गंभीर आरोपही केले. “या धमकी प्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल आली आहे. पण माझा पूर्ण विश्वास आहे की, यामागे मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आहेत”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – IAS Puja Khedkar : पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; आई मनोरमा यांच्याबद्दल म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोस्ट करत दिली होती माहिती

तत्पूर्वी वसंत मोरे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती. “मी पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो, तर असा कोणता गुन्हा केला की मनसेचे कार्यकर्ते माझा खून करण्यापर्यंत गेले?” असं वसंत मोरे म्हणाले होते. तसेच याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मागणी करत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले होतं. वसंत मोरे यांनी याबरोबरच कथिक मनसे कार्यकर्त्याची एक ऑडिओ क्लिपदेखील शेअर केली होती.