पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वीच मनसेला राम राम ठोकला. महाविकास आघाडीच्या कोट्यातून मोरेंना पुणे लोकसभेची जागा मिळू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण काँग्रेसकडे पुणे लोकसभा मतदारसंघ असून त्यांनी विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे वसंत मोरे पुढे काय करणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पुणे लोकसभा निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही, असे स्टेटस वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर टाकले होते. त्याप्रमाणे त्यांनी आता पुणे लोकसभेसाठी मित्र पक्षांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली असून आज त्यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

काय म्हणाले वसंत मोरे?

“मी शंभर टक्के पुणे लोकसभेची निवडणूक लढणार आहे. मी माझं नशीब समजतो की, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मला इथं बोलावलं. मला त्यांनी पुरेसा वेळ दिला, त्यातून आमची अतिशय चांगली चर्चा झाली. पुण्यातील मतदान चौथ्या टप्प्यात होणार आहे, त्यामुळे आमच्याकडे खूप वेळ आहे. पुढील काही दिवसांत कोणता मार्ग स्वीकारायचा याबाबत निर्णय घेऊ. पुणे लोकसभेसाठी वंचितचा उमेदवार द्यायचा की नाही याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील”, असे वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिले.

Sunetra Pawar campaign started at Maruti Mandir in Kanheri in Baramati.
विकास त्यांनीच केला काय? बारामतीमधील कामांवरून अजित पवार यांचा सवाल; शरद पवार यांच्यावर टीका
Sadabhau Khot on Devendra Fadnavis
“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान
Former MLA Dilip Kumar Sananda sent letter to Mallikarjun Kharge demanding support for Adv Prakash Ambedkar in Akola
ॲड. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पाठिंबा देणार? माजी आमदार म्हणतात, “धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी…”
sanjay raut prakash ambedkar tweet
“वंचितच्या पाठित खंजीर खुपसलात’, प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला; मविआतल्या अंतर्गत बाबी जाहीर करत म्हणाले…

महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण दिसेल

वसंत मोरे यांच्या भेटीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “वसंत मोरे यांच्याबरोबर आमची चर्चा आज झाली. अधिकृत निर्णय ३१ मार्च पर्यंत आम्ही जाहीर करू. महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल, ती कोण कोण करणार आहे. हे अधिकृतरित्या काही दिवसांतच सर्वांसमोर मांडू. काही चर्चा आताच जाहीर करू शकत नाही.”

मी नवीन राजकीय समीकरण मांडू इच्छित आहे, असे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.