Dahi Handi 2022 Celebration in Mumbai : ठाण्यात मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत कोकण नगर जोगेश्वरी मंडळाने यंदाची पहिली नऊ थराची सलामी दिली. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हेही उपस्थित होते. दहीहंडी पथकाने नऊ थर रचल्यानंतर या ठिकाणी आनंद व्यक्त करत एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं.

यावर बोलताना अविनाश जाधव म्हणाले, “कोकण नगर पथकाने त्यांच्या दहीहंडीची सुरुवात येथेच केली आहे. त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या देखील शुभेच्छा आहेत. हिंदू सण टिकले पाहिजेत याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे.”

व्हिडीओ पाहा :

“राज ठाकरे यांनी सांगितले नसते आणि ही मुले उभी राहिली नसती, तर हा सण इतक्या आनंदात साजरी झाला नसता. सगळ्यांच्या मेहनतीने हा थर झाला,” असंही अविनाश जाधव यांनी सांगितलं.

भांडूप व्हिलेज रोड येथेही मनसेकडून आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांची सलामी

भांडूप व्हिलेज रोड येथेही मनसेकडून आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांची सलामी देण्यात आली. याबाबत मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती दिली. त्यात म्हटलं, “मुंबईतील भांडूप व्हिलेज रोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष मोहन चिराथ यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवात जोगेश्वरी येथील ‘जय जवान’ गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली.”

हेही वाचा : Dahi Handi 2022 : मुंबईत विविध ठिकाणी १२ ‘गोविंदा’ जखमी; रूग्णालयात उपचार सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पक्षाचे सरचिटणीस मनोज चव्हाण आणि मोहन चिराथ यांच्या हस्ते गोविंदा पथकांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह पारितोषिक म्हणून देण्यात आले. या मनसे दहीहंडी महोत्सवात सहभागी होण्यासाठी १२० हून अधिक गोविंदा पथकांनी नोंदणी केली. विजेत्यांना ११ लाख रुपयांची पारितोषिकं देण्यात येणार आहेत,” असंही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं.