scorecardresearch

‘एकनाथ शिंदेंनीच कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला मातोश्रीवर पाठवलं’; विनायक राऊतांचं थेट विधान, म्हणाले…

कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी आणि उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ फोटोवर विनायक राऊतांनी मोठं विधान केलं.

vinayak raut and eknath shinde
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमृता फडणवीसांनी तक्रार दाखल केल्यानंतर मलबार हिल पोलिसांनी संशयित आरोपी महिला अनिक्षा जयसिंघानीला काही दिवसांपूर्वी अटक केली. त्यानंतर आज मुंबई पोलिसांनी कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी अनिल जयसिंघानी याला अटक केल्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी अनिल जयसिंघानी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याचे उद्धव ठाकरेंबरोबर चांगले संबंध असल्याचा आरोपही भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आला. या संपूर्ण घडामोडींनंतर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा- “…आम्ही ते तत्व मान्य केलं”, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

आरोपी अनिल जयसिंघानी याला मातोश्रीवर आणण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग असल्याचं विधान विनायक राऊत यांनी केलं. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत म्हणाले, “अमृता फडणवीस आणि आरोपी अनिक्षा जयसिंघांनी यांच्यात चांगले संबंध होते, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलं आहे. हाच अनिल जयसिंघानी एकदा मातोश्रीवर आला होता. तो उद्धव ठाकरेंना भेटला. त्याचे फोटो आता काही भाजपावाले दाखवत आहेत. पण अनिल जयसिंघानीला मातोश्रीवर कुणी आणलं? याचं उत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.”

हेही वाचा- अनिल जयसिंघानीला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत आणलं होतं? आदित्य ठाकरे म्हणाले…

“अनिल जयसिंघानीला मातोश्रीवर आणणारे आता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले आहेत,” असं विधान विनायक राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 19:58 IST

संबंधित बातम्या