लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विष्णुदास भावेगौरवपदक, रोख रक्कम रु.२५ हजार, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे.

आणखी वाचा-सांगली-मिरजेत रंगभूमीदिन साजरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्याना हा पुरस्कार अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगलीच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे, बलदेव गवळी, मुकुंद पटवर्धन आदींसह नाट्य विद्यामंदिर समितीचे विश्वस्स, नाट्यरसिक उपस्थित होते.