सातारा: शिवथर (ता. सातारा) येथील गुजाबा वस्तीवरील शेतातील घरात पूजा प्रथमेश जाधव (वय ३०) या महिलेचा अज्ञाताने धारदार शस्त्राने सोमवारी सायंकाळी खून केल्याचे उघडकीस आले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती व परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. खुनाच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
तांत्रिक माहितीच्या आधारे व परिसरातील माहितीवरून रात्री साडेअकरा वाजता अक्षय साबळे (शिवथर ता. सातारा) याला स्वारगेट बस स्थानकातून अटक करण्यात आली. लग्नाला नकारा दिला म्हणून साबळे याने महिलेचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी सांगितले.
पूजा जाधव हिचा अकरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पती प्रथमेश हा साताऱ्यात काम करतो. सोमवारी सकाळी पती नेहमीप्रमाणे कामावर गेला तर सासू-सासरे शेतात आणि पाचवी इयत्तेत शिकणारा त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. पूजा घरात एकटीच होती. तिचे सासरे घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सातारा तालुका पोलिसांना माहिती कळविताच अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक नीलेश तांबे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह ठसेतज्ज्ञ, श्वान पथक उपस्थित झाले. खून करणाराची माहिती मिळत नव्हती. यासाठी तांत्रिक माहिती, तालुका पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वेगवेगळ्या पथकांद्वारे खुन्याचा शोध सुरू होता.
पोलीस निरीक्षक नीलेश तांबे व गुन्हे प्रकटीकरण, स्थानिक गुन्हे शाखा व तांत्रिक माहितीच्या आधारे व परिसरात मिळालेल्या माहितीवरून रात्री साडेअकरा वाजता अक्षय साबळे (शिवथर ता. सातारा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला अटक करण्यात आली. आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खून उघडकीस आल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती व परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. खुनाच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. तांत्रिक माहितीच्या आधारे व परिसरातील माहितीवरून रात्री साडेअकरा वाजता अक्षय साबळे (शिवथर ता. सातारा) याला स्वारगेट बस स्थानकातून अटक करण्यात आली. लग्नाला नकारा दिला म्हणून साबळे याने महिलेचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी सांगितले.