अलिबाग: महाड तालुक्यातील काळीज येथील १८ वर्षीय तरुणाचा शिवाजी वाळण येथील घावर कुंड येथील धबधब्यात दुर्दैवी मृत्यु झाला आहे. स्मित राजेंद्र घाडगे वय वर्ष १८ रा. काळीजी असे मृत तरुणाचे नाव आहे.
आणखी वाचा-वाई न्यायालयात मोक्यातील आरोपींवर गोळीबार
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सोमवरी संध्याकाळी काळीज गावातील ७ ते ८ तरुण घावर कुंड येथे पावसाळी पर्यटनासाठी गेले होते. धबधब्याजवळील कुंडात पोहोत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने स्मित बुडला आणि त्याचा मृत्यु झाला आहे. ऍडव्हेंचर सोल, महाड या बचाव पथकाच्या सदस्याने मृतदेह बाहेर काढला.