सांगली : मिरजेतील कृष्णाघाट रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली चोरीचे सोने विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला अटक करुन १७ लाख ६१ हजाराचे चोरीतील सुवर्णालंकार पोलीसांनी बुधवारी जप्त केले. मिरजेसह तीन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली त्यांने दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला घाट रस्त्यावर संशयित तरुण चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करणेकरीता येणार असल्याची माहिती मिळाली होती.

हेही वाचा >>> सोलापूर : बोट दुर्घटनेपाठोपाठ वीज कोसळून करमाळ्यात मुलाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीसांनी पुलाचे परिसरात सापळा लावून निगराणी करीत असताना, एक इसम पुलाखाली येवून थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने अमित राकेश पंचम (वय ३० वर्षे, सध्या रा. वानलेसवाडी, सांगली मुळ रा. राबोडी, शिवाजीनगर, ठाणे) असे असलेचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या हातातील पिशवीत १७ लाख ६१ हजाराचे २९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ८० ग्रॅम वजनाचे ४ हजाराचे चांदीचे दागिने मिळुन आले. त्याने सागितले की, त्याचेजवळ मिळुन आलेले सोन्या चांदीचे दागिने हे मिरज व नौपाडा (जि. ठाणे) येथे घरफोडी करुन या ऐवजाची चोरी केली होती. त्यातीलच हे दागिने असल्याची कबूली दिली.