News Flash

रणबीरनेच रणवीरला दिला फर्स्ट ब्रेक; ‘हे’ काम देत संपवला ६ वर्षांचा वनवास

रणवीर सिंग ६ वर्ष भटकत होता कामासाठी; रणवीरला आठवला संघर्षाचा काळ

रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील सध्याचा आघाडिचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. या अष्टपैलू अभिनेत्यानं रोमँटिक हिरोपासून थरकाप उडवणाऱ्या खलनायकापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर त्याने बॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. परंतु हा प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर त्याला ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या निमित्तानं त्याने बॉलिवूडमधील आपली १० वर्ष पुर्ण केली आहेत.

अवश्य पाहा – VJ ते प्रसिद्ध अभिनेत्री; ७ वर्षात यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या चित्राची आत्महत्या

आज तकला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने आपल्या करिअरवर भाष्य केलं. या मुलाखतीत त्याने आपल्या आयुष्यातील काही थक्क करणारे प्रसंग सांगितले. तो म्हणाला, “लहानपणापासूनच मला अभिनयाची प्रचंड आवड होती. लोकांना आश्चर्यचकित करायला मला खूप आवडतं. अन् याच स्वभावनं मला बॉलिवूडच्या दिशेने आकर्षित केलं. कुटुंबातील काही लोकांची बॉलिवूडमध्ये थोडीफार ओळख होती त्यामुळे मला सहज काम मिळेल असं वाटत होतं. पण माझा भ्रमनिरास झाला. जवळपास सहा वर्ष मी कामाच्या शोधात होतो. अनेक निर्मात्यांना भेटलो. ऑडिशन्स दिली. निर्मात्यांच्या ऑफिसबाहेर तासनतास बसायचो पण काम मिळत नव्हतं. मग चित्रपटांमध्ये एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून काम शोधू लागलो. त्याचवेळी मला बँड बाजा बाराज या चित्रपटाविषयी माहिती मिळाली अन् मी ऑडिशन दिलं. सुरुवातीला रणबीर कपूर या चित्रपटात झळकणार होता परंतु त्याने तो चित्रपट सोडला त्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली. सुदैवानं प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला. परिणामी इतर निर्मात्यांनी देखील माझ्यावर गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली.”

अवश्य पाहा – Forbes List 2020: सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत बॉलिवूडचाच दबदबा

२०१० साली बँड बाजा बारात या चित्रपटातून रणवीरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात रणवीरसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं मुख्य भूमिका साकारली होती. जबरदस्त गाणी आणि उत्तम पटकथा यामुळे हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामुळेच रणवीर रातोरात सुपरस्टार झाला असं म्हटलं जातं. आज या चित्रपटाला १० वर्ष पुर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं रणवीरने देखील आपल्या आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची १० वर्ष पूर्ण केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 1:10 pm

Web Title: 10 years of ranveer singh in bollywood mppg 94
Next Stories
1 ‘या’ हॉलिवूडपटात निक-प्रियांका पहिल्यांदाच एकत्र
2 वरुण धवन, क्रिती सेनॉन पाठोपाठ नीतू कपूरही करोना पॉझिटिव्ह
3 राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील घरांची किंमत ठरली
Just Now!
X