News Flash

..म्हणून सुशांतच्या शेवटच्या चित्रपटातील ‘हा’ डायलॉग होतोय ट्रेण्ड

मनाला भिडणारा सुशांतचा संवाद

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘दिल बेचारा’ असं या चित्रपटाचं नाव असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुशांतने पुन्हा एकदा त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. अभिनयासोबतच ट्रेलरमधील एक संवाद चांगलाच गाजतोय.

“जनम कब लेना है, मरना कब है ये हम डिसाइड नहीं कर सकते. पर कैसे जिना है ये हम डिसाइड कर सकते है”, असा चित्रपटात सुशांतचा संवाद आहे. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. त्यामुळे चित्रपटात सुशांतच्या तोंडी असलेला हा संवाद प्रेक्षकांच्या मनाला विशेष भावतोय.

या चित्रपटात सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. मुख्य भूमिका असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुशांतचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 5:19 pm

Web Title: a dialogue from sushant singh rajput last movie dil bechara is trending ssv 92
Next Stories
1 केआरकेने सुशांतवर केलेला जुना व्हिडीओपाहून नेटकरी संतापले…
2 Dil Bechara Trailer : सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
3 झीटॉकीज घेऊन येत आहे खास १० चित्रपट
Just Now!
X