नव्वदच्या दशकात सुपरहिट ठरलेल्या ‘दिल’ चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार आहे. माधुरी दीक्षित, आमिर खान यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट खुपच गाजला होता. माधुरी-आमिरच्या केमिस्ट्रीसोबतच या चित्रपटातली गाणीदेखील सुपरहिट ठरली होती. या चित्रपटाचा सीक्वल काढण्याचा मानस दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी बोलून दाखवला आहे.
‘टोटल धमाल’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ‘दिल’चा सीक्वल काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सीक्वलचं नाव ‘दिल अगेन’ असेल असंही ते म्हणाले. चित्रपटाची कथा अजून निश्चित झाली नाही मात्र चित्रपटाचा सीक्वल नक्की येईल असं सांगत त्यांनी चाहत्यांना आश्वस्त केलं आहे. या चित्रपटात माधुरी-आमिर ही जोडी पुन्हा पाहायला मिळणार की नवी जोडी या दोघांची जागा घेणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.
या चित्रपटाचा तेलगू, कन्नड भाषेत रिमेकही करण्यात आला होता. या दोन्ही भाषेतील चित्रपटांनादेखील तेवढीच तुफान प्रसिद्धी लाभली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 6:08 pm