News Flash

आमिर खानच्या मुलीचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ व्हायरल; वडिलांच्या फिटनेस ट्रेनरसोबत आयराचं अफेअर

वडील आमिर खानने दिली नाही प्रतिक्रिया

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ती शेअर करत असलेल्या बोल्ड आणि हॉट फोटोजमुळे नेहमीच चर्चेत असते. पण यंदा ती चर्चेत येण्यामागे कारण वेगळं आहे. आयरा खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये आयरा तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसून आली आहे.

आयरा खान तिच्या सोशल मीडियावर नेहमी बिनधास्तपणे पोस्ट शेअर करत असते. लोक काय म्हणतील, हा विचार ती कधीच करत नाही. आपल्या वडिलांच्या विचारसरणीला फॉलो करत ती सुद्धा वेगळ्या धाटणीच्या विचारांची मुलगी आहे. यामुळेच ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटोज आणि व्हिडीओज कोणतंही दडपण न घेता बिनधास्तपणे शेअर करत असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंडसोबतचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नूपुर शिकरे एकमेकांसोबत क्वालिटी टाईम एन्जॉय करताना दिसून येत आहेत. ते दोघेही एका पुलमध्ये एन्जॉय करताना दिसून आले. “तूच माझा आधार आहेस, आता मला मी वेडी झाल्यासारखं वाटू लागलंय…आय लव्ह यू क्यूटी”, असं कॅप्शनमध्ये लिहित तिने हा व्हिडीओ शेअर केलंय. तसंच ##dreamboy हा हॅशटॅग देखील वापरलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयरा खानचा बॉयफ्रेंड नूपुर शिकरे हा तिचे वडील आमिर खानचा आधीचा फिटनेस ट्रेनर होता. वडीलांच्या फिटनेस ट्रेनरसोबत आयरा खानचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चा आतापर्यंत रंगत होत्या. त्यानंतर आता तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे अफेअरच्या चर्चांववर आता खात्री पटली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयरा खानने बॉयफ्रेंडसोबतचा शेअर केलेला हा रोमॅण्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिचा बॉयफ्रेंड नूपुरने सुद्धा “आयरा आय लव्ह यू” असं लिहित या व्हिडीओवर कमेंट केली आहे. आता आयरा आणि नूपुर यांच्यातील नात्याबद्द्ल सर्वांनाच ठाऊक झाल्यामुळे आमिर खानलाही याची जाणीव होईल हे उघड आहे. परंतु त्यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. आमिर सोशल मीडियावर क्वचितच अ‍ॅक्टिव्ह असतो आणि आपलं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवणं पसंत करतो. पण व्हिडीओमधील त्यांची केमिस्ट्री पाहिल्यास असं वाटतंय की आयरा आणि नुपूरच्या नात्याला वडील आमिर खानकडून निश्चितच मान्यता मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 9:09 pm

Web Title: aamir khans daughter ira khan confesses her love boyfriend nupur shikhare shares new pics prp 93
Next Stories
1 वाजिद खानच्या पत्नीनं १६ कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा
2 मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दिशाने पहिल्यांदा केली पोस्ट
3 Koo अ‍ॅपवर अनुपम खेर यांचे १ मिलियन फॉलोअर्स; बॉलिवूड बाहेरही कडक रेकॉर्ड
Just Now!
X