News Flash

‘अमित कुमार यांना शो आवडला नव्हता तर..’, इंडियन आयडलमधील ‘त्या’ वादावर अभिजीत सांवतची प्रतिक्रिया

अमित कुमार यांनी काही दिवसांपूर्वी शोवर टीका केली होती.

सध्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शोच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतने शोबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्याने निर्मात्यांना गुणांपेक्षा गरिबी दाखवण्यात जास्त इंट्रेस्ट असे म्हटले होते. काही दिवसांपूर्वी किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी इंडियन आयडल १२मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी शोवर टीका केली होती. आता अभिजीतने त्यांना सुनावले आहे.

अमित कुमार यांनी हजेरी लावलेल्या एपिसोडमध्ये परिक्षक आणि स्पर्धकांनी मिळून १०० गाणी गायिली आणि किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. पण परिक्षक नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी गाणे गायल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अमित कुमार यांनी ‘मला माहिती आहे की लोकं त्या एपिसोड विषयी वाईट बोलत आहेत. शोमध्ये स्पर्धकाने कसेही गाणे गायिले तरी मला त्यांची प्रशंसा करण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच त्यासाठी ते मला चांगले मानधन देणार होते’ असे म्हटले होते. आता अभिजीत सावंतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : ‘कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्री आर्थिक संकटात; २०११ पासून ‘या’ आजाराने आहे त्रस्त

एका मुलाखतीमध्ये अभिजीत म्हणाला, ‘जर अमित कुमार यांना शो आवडला नव्हता तर त्यांनी तेव्हाच सांगायला हवे होते. त्यांना शोमधील स्पर्धकांनी गायिलेली गाणी आवडत नाहीत असे सांगायचे होते. एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना स्पर्धकांनी गायिलेली गाणी आवडली नाही असे बोलायला नको होते.’

Indian Idol: ‘सर्व स्पर्धकांची प्रशंसा करण्यास सांगितले होते’, अमित कुमार यांचा खुलासा

पुढे तो म्हणाला, ‘मला असे वाटते की अमित यांनी आधीच सांगितले असते की शोचा कंटेंट किंवा स्पर्धकांनी गायिलेली गाणी आवडली नाहीत. तर स्पर्धकांनी आणखी मेहनत घेऊन चांगली गाणी गायिली असती. माझा विश्वास आहे क्रिएटीव्ह टीमने याकडे नक्की लक्ष दिले असते. ते देशातील प्रसिद्ध गायकांपैकी आहेत. एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी असे बोलायला नको होते.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 10:53 am

Web Title: abhijeet sawant reacts on amit kumar criticism of indian idol 12 avb 95
Next Stories
1 Video : वडिलांच्या मृत्यूसाठी रुग्णालय जबाबदार, सगळे डॉक्टर देव नसतात- संभावना सेठ
2 ‘संदीप और पिंकी फरार’वर प्रेक्षक फिदा; सोशल मीडियावर परिणीती अर्जूनचं होतंय कौतुक
3 संगीतकार लक्ष्मण कालवश
Just Now!
X