अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली जातेय. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता अभिषेक बच्चन याने उडी घेतली आहे. “माझ्या वडिलांनी माझ्यासाठी चित्रपट तयार केला नाही, उलट मीच त्यांच्यासाठी चित्रपटाची निर्मिती केली.” असं प्रत्युत्तर त्याने टीकाकारांना दिलं आहे.

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

अभिषेक हा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. त्याचे वडील अमिताभ आहेत त्यामुळे त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळते, अशी टीका त्याच्यावर वारंवार केली जाते. मात्र या टीकाकारांना अभिषेकने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अवश्य पाहा – ‘आमच्या भावनांशी खेळ नकोस’; दया बेनच्या त्या फोटोंवर चाहते संतापले

आज तकला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी कधीही कोणाला फोन करुन माझ्यासाठी काम मागितलं नाही. अन् ते मागणारही नाहीत. कारण बिग बी अत्यंत स्वावलंबी आहेत. मी देखील इतर कलाकारांप्रमाणे ऑडिशन देऊनच कामं मिळवली आहेत. त्यामुळे उगाच माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करणं चुकीचं आहे. स्टार किड्सला काम मिळवणं थोडं सोप असतं हे मी मान्य करतो. पण चित्रपट फ्लॉप झाले तर त्यांना देखील कोणी विचारत नाही. अशी शेकडो उदाहरणं तुम्हाला मिळतील. चित्रपट उद्योग हा एक व्यवसाय आहे. इथे नफा आणि तोटा याची गणितं चालतात. शिवाय माझ्या वडिलांनी कधीही माझ्यासाठी चित्रपट तयार केला नाही. पण मी त्यांच्यासाठी ‘पा’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.”