News Flash

ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण; अभिषेक बच्चन म्हणाला तिला माहितेय..

"आराध्या आता फक्त नऊ वर्षांची आहे."

बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटीजच्या यादीत बच्चन हे नाव कायमच अग्रस्थानी राहिलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या आडनावाचा ठसा उमटवला आहे. एवढचं नाही तर बिग बी यांचे वडील म्हणजेच डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी आणि लेखक होते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंबाची मोठी प्रतिष्ठा असून विशेष स्थान आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन याने मुलगी आराध्याला आपण विशेष कुटुंबातून आहोत याची कल्पना असून तिला ऐश्वर्याने योग्य ती शिकवण दिल्याचं नुकतच एका मुलाखतीत म्हंटलं आहे. अभिषेक बच्चनने नुकतीच आरजे सिद्धार्थ कन्नन याला एक मुलाखती दिली. यात त्याने ऐश्वर्याने जबाबदारी सांभाळत आराध्याला आपण कोणत्या कुटुंबातील आहोत त्यामुळे आपल्याला कसं वागलं पाहिजे याची शिकवण दिल्याचं म्हंटलं आहे.

ऐश्वर्याने आराध्याला योग्य शिकवण दिली आहे.
आरजे सिद्धार्थशी बोलताना अभिषेक म्हणाला, “आराध्या आता फक्त नऊ वर्षांची आहे आणि सध्या ती ऑनलाईन शाळेत व्यस्त आहे. आपले आजी-आजोबा आणि आई-वडील अभिनय क्षेत्रात असून आज लोखो लोक त्यांच्यावर प्रेम करतात त्यांचा आदर करतात याची आराध्याला कल्पना आहे. त्यामुळे ऐश्वर्यानी तिला इतरांचा आपणही आदर व्यक्त करायला आणि त्याची प्रशंसा करायला शिकले पाहिजे आणि देवाचे कायम आभार मानले पाहिजे हे शिकवंल आहे. ती ठिक आहे.तिच्यासाठी या गोष्टी आता सामान्य आहेत. ती आमचे सिनेमा पाहते आणि एन्जॉय करते.” असं अभिषेक म्हणाला.

काजोलच्या लेकीचा डान्स पाहिला का?, ‘बोले चुडिया’ गाण्यावर नास्याचे ठुमके

आराध्या फोटोग्राफर्सना कशी समोरी जाते या सिद्धार्थच्या प्रश्नावर अभिषेक म्हणाला, ” सुरूवातीला ती घाबरायची.तिच्या मम्मीने तिला शिकवलंय आता ती चांगलं हॅण्डल करते.”

अभिषेकचा ‘बिग बुल’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर लवकरच तो ‘दसवी’ या त्याच्या आगामी सिनेमातून झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 2:36 pm

Web Title: abhishek bachchan revealed how aaradhya aware of her family legacy aishwarya teaches her everything kpw 89
Next Stories
1 दीपिका पादुकोनने दिला MAMIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
2 मोराजवळ जाऊन फोटो काढणे अभिनेत्रीला पडले महागात, पाहा व्हिडीओ
3 ‘भूलभूलैय्या-२’ चे दिग्दर्शक अडकलेत लॉकडाऊनच्या भूलभूलैय्यात!
Just Now!
X