रिंकु  राजगुरू

‘सैराट’च्या प्रदर्शनाची चार वर्षे पूर्ण झाली आहेत आणि सध्या ती ‘हॉटस्टार’वर ‘हण्ड्रेड’ या वेबमालिके च्या निमित्ताने नव्या रंगात-नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहे. पहिल्यांदाच लारा दत्ता, मकरंद देशपांडे यांच्यासारख्या कलाकारांबरोबर हिंदी वेबमालिके त काम करण्याचा अनोखा अनुभव गाठीशी बांधला गेला आहे, शिवाय पहिल्यांदा रुची नारायण सारख्या महिला दिग्दर्शिके बरोबर काम करण्याची संधी मिळाली, असे सांगणारी ‘आर्ची’ अर्थातच अभिनेत्री रिंकू  राजगुरू  टाळेबंदीच्या काळातच नव्या भूमिके तून आणि नव्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली असल्याने खूप खूष आहे.

मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी मुंबईत आले असताना मला दिग्दर्शक रुची नारायण हिने संपर्क के ला होता. ‘हण्ड्रेड’ नावाची वेबमालिका आम्ही लिहिली आहे आणि तुझा विचार करूनच यात एक भूमिका लिहिली आहे, असे तिने सांगितले. ‘सैराट’नंतर मला आर्चीच्याच भूमिका जास्त येत होत्या, आपल्याकडे हिरोच महत्त्वाचा असतो. तोच हाणामारी करतो, लोकांचा जीव वाचवतो, हिरॉइनबरोबर गाणी गातो.. मला अशा भूमिका करण्यात अजिबातच रस नव्हता. त्याऐवजी एखादी चांगली पटकथा असेल आणि मला त्याचा भाग होता येत असेल तर ती मी स्वीकारतेच, असे रिंकू  सांगते.  ‘हण्ड्रेड’च्या बाबतीत मला नेत्राची जी भूमिका साकारायची होती ती पूर्णपणे वेगळी होती. मुंबईत राहणारी, काम करणारी अशी ही मुलगी कशी असेल, कशी वागेल याची मला काहीच कल्पना नव्हती. मात्र दिग्दर्शिके शी चर्चा करून अगदी सहजपणे मी ती भूमिका साकारली. सेटवर चित्रीकरण सुरू आहे असे वाटूच नये इतक्या सहज, मोकळ्या वातावरणात आम्ही ही वेबमालिका के ली. या वेबमालिके च्या चित्रीकरणानंतर मात्र मला सुट्टीची खरंच गरज होती, असे तिने सांगितले. विश्रांतीचा हा काळ अर्थात असा टाळेबंदीचा सक्तीचा नको होता, पण तरीही जी सुट्टी मिळाली आहे ती सध्या मी सत्कारणी लावते आहे, असे तिने सांगितले.

मी खूप वेगळे काही करते आहे असे नाही. माझ्या मित्रमैत्रिणी किं वा इतर लोक जसे या काळात अवांतर गोष्टी करत आहेत तशाच मीही करते आहे. पण माझा भर सध्या हिंदी पुस्तकांच्या वाचनावर जास्त आहे. मुन्शी प्रेमचंद यांच्या क था मी वाचते आहे, असे रिंकू ने सांगितले. वाचनाबरोबरच चित्रपट आणि विविध भाषेतील वेबमालिकाही प्राधान्याने पाहते आहे, असे सांगणाऱ्या रिंकू ने नुकतीच  प्रदर्शित झालेली ‘शी’ वेबमालिका पाहिल्याचेही सांगितले. या सगळ्याबरोबरच आईला घरकामात मदत करणे, नवनवीन गोष्टी करून बघणे, घरच्या घरी बेकिं गही  करून पाहात असल्याचे रिंकू ने सांगितले. यापुढच्या काळात ठरावीक साच्याच्या भूमिका न करता वेगवेगळ्या पद्धतीचे काम क रायचा मानस  तिने व्यक्त के ला.

शब्दांकन : रेश्मा राईकवार