News Flash

“एवढ्या शिक्षणाचा काय फायदा?”, हिजाब घातल्याने सना खान झाली ट्रोल

या फोटोत हिजाब घातल्याने सनाला ट्रोल करण्यात आलं आहे. सनाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

(Photo Credit : Sana Khan Instagram Image)

छोट्या पडद्यावरली ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सना खानने चित्रपटसृष्टीला निरोप दिला आहे. सनाने चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला असला तरी ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. सना अनेक वेळा सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत असते. दरम्यान, सनाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे सना ट्रोल झाली आहे.

सनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनाने हिजाब परिधान केला आहे. सनाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिची स्तुती केली आहे. तर अनेकांनी सनाने हिजाबमध्ये फोटो शेअर केल्याने ट्रोल केले आहे. मात्र, सनाने एका नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. एका नेटकऱ्याने सनाला प्रश्न विचारला की “एवढं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याचा काय फायदा सगळ्यांसारखं पडद्याच्या मागेच रहायच आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

sana khan viral post sana khan trolled for hijab

 

या नेटकऱ्याला उत्तर देत सना म्हणाली, “जेव्हा मी पडद्यात राहून माझा व्यवसाय करु शकते, माझे सासू-सासरे आणि नवरा खूप चांगले आहेत, मग मला आणखी काय पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्लाह माझे संरक्षण करतो. आणि मी माझे शिक्षण पूर्ण केले आहे. तर यात माझाच विजय आहे की नाही?”

“लाज वाटत नाही का”, मालिकेतील संस्कारी सुनेचा बिकीनी अवतार पाहून चाहते संतप्तआणखी वाचा : 

दरम्यान, सनाने गेल्या वर्षी इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडली आहे. यानंतर सनाने गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 5:28 pm

Web Title: actress sana khan trolled for wearing hijab gives befitting reply dcp 98
Next Stories
1 कॅन्सरचं निदान झाल्यानंतर किरण खेर यांची पहिली झलक, मुलाला म्हणाल्या ‘लग्न कर’
2 ‘उगाच हीरोपंती करु नका’, टायगर-दिशावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांचा इशारा
3 सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष होत असतानाच अंकिता लोखंडेचा सोशल मीडियावरून ब्रेक
Just Now!
X