News Flash

आदित्यच्या घरी लगीनघाई! पार पडला रोका समारंभ

पाहा, आदित्य- श्वेताच्या रोका समारंभाचा फोटो

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आता आदित्य नारायण याच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. नुकताच आदित्य आणि श्वेताचा रोका समारंभ पार पडला आला. आदित्यच्या एका फॅन पेजवर या दोघांच्या रोका समारंभाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

आदित्य लवकरच प्रेयसी श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्यने सोशल मीडियावर श्वेतासोबत असलेल्या नात्यावर कबुली दिली होती. त्यानंतर आता या दोघांच्या घरी लग्नाची गडबड सुरु झाली आहे. विशेष म्हणजे लग्नाची तयारी करण्यासाठी आदित्यने काही काळ सोशल मीडियापासून लांब राहण्याचंदेखील ठरवलं आहे.


सध्या सोशल मीडियावर आदित्य- श्वेताच्या रोका समारंभाचा फोटो व्हायरल होत असून या फोटोमध्ये आदित्य आणि श्वेता या दोघांचे कुटुंबीय दिसून येत आहेत.

आदित्य हा प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा असून तोदेखील गायक आणि अभिनेता आहे. त्यासोबतच त्याने रिअॅलिटी शो इंडियन आयडलचे सूत्रसंचालही केलं आहे. तर आदित्य प्रेयसी श्वेता एक अभिनेत्री असून तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आदित्य-श्वेताची भेट ‘शापित’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 3:12 pm

Web Title: aditya narayan and shweta agarwal roka ceremony pic ssj 93
Next Stories
1 ‘शाहरुख प्रमाणे बुर्ज खलिफावर वाढदिवस साजरा करायची इच्छा’, सोनू सूदचे नेटकऱ्याला भन्नाट उत्तर
2 Video : बम भोले! अंगावर काटा आणणारं ‘लक्ष्मी’मधील गाणं प्रदर्शित
3 Big Boss 14: निक्कीने धुतली अभिनेत्याची अंतर्वस्त्रं; माजी स्पर्धक संतापले
Just Now!
X