News Flash

‘टिवटिवाट’नं उजाडली सोनू निगमची सकाळ; अजानचा व्हिडिओ केला शेअर

सोनू निगमच्या या ट्विटनं पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मौलवीनी दिलेल्या धमकीचा समाचार घेताना गायक सोनू निगमने मुंडन करवून घेतले होते.  (छाया-दिलीप कागडा)

अजानवर आक्षेप घेतल्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेला प्रसिद्ध गायक सोनू निगमचा टिवटिवाट अद्याप थांबलेला नाही. त्यानं अजानचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच ‘गुड मॉर्निंग इंडिया’ असं ट्विट केलं आहे. सोनू निगमच्या या ट्विटनं पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मशिदीच्या भोंग्यावरून होणाऱ्या अजानला सोनू निगमनं आक्षेप घेतला होता. यावरून बॉलिवूडमधील दिग्गजांसह अनेकांनी सोनूवर टीकास्त्र सोडलं होतं.

संगीतकार साजिद-वाजिद आणि पूजा भट्ट हिनेही सोनूवर नाराजी व्यक्त केली होती. अजानवर आक्षेप घेणाऱ्या सोनूचे मुंडन केल्यास त्याला बक्षीस देण्यात येईल, असं पश्चिम बंगालमधील मौलवींनी जाहीर केलं होतं. या वादावर पडदा टाकण्यासाठी सोनूनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं. मी धर्माच्या विरोधात नसून माझा ध्वनिक्षेपकाला विरोध होता, असं त्यानं स्पष्ट केलं होतं. तसंच माझ्या मतावर मी ठाम आहे, असंही ठामपणे सांगितलं होतं. इतकंच नाही तर मौलवींनी दिलेलं आव्हान स्वीकारून सोनूनं मुंडनही केलं होतं.

धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मी ध्वनिक्षेपकावर आक्षेप घेतला होता. माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं त्यानं म्हटलं होतं. मुंडन करून टीकाकारांना चोख उत्तर देणाऱ्या सोनू निगमचं सोशल मीडियावरून काहींनी कौतुकही केलं होतं. बॉलिवूडमधून अनेकांनी त्याला पाठिंबा दिला. सोनूच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद संपुष्टात येईल असं वाटत असतानाच आज पुन्हा एकदा सोनूनं अजानचा रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 12:22 pm

Web Title: after azaan controversy issue sonu nigam now posts recording of an azaan on twitter
Next Stories
1 संजू बाबाची आमिरसोबतची टक्कर टळली, ‘भूमी’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत फेरबदल
2 तंत्राचे बाहुबळ..
3 डोंबिवलीचा ‘बाहुबली’
Just Now!
X