27 January 2021

News Flash

अग्गंबाई सासूबाई : अभिजीतच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल मॅडी करणार खुलासा

मालिकेत येणार नवीन ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील कथानकात दररोज नवनवीन वळणं पाहायला मिळत आहेत. अभिजीत (गिरीश ओक) आणि शुभ्रा (तेजश्री प्रधान) मिळून आसावरीसाठी नवीन प्लॅन आखत आहेत. आसावरीने (निवेदिता सराफ) बबड्या अर्थात सोहमचे (आशुतोष पत्की) किती लाड केले आहेत आणि त्याच्यासाठी ते किती वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न अभिजीत करत आहेत. मात्र आता मालिकेच्या पुढील भागांत अभिजीत यांच्याबद्दलचा मोठा खुलासा होणार आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘अभीज किचन’मध्ये काम करणारी मॅडी आसावरीकडे अभिजीतच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल खुलासा करणार आहे. आता हा खुलासा नेमका काय असेल आणि त्यावर आसावरीची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अभिजीत यांच्या बदललेल्या स्वभावामुळे आसावरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे सोहमला त्यांच्या वागण्याबद्दल प्रश्न पडला आहे. अभिजीत आणि शुभ्राचा प्लॅन हळूहळू यशस्वी होत असतानाच मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 11:25 am

Web Title: aggabai sasubai maddy to inform asawari about abhijeets affair ssv 92
Next Stories
1 कंगनाने शेअर केला ‘मणिकर्णिका’च्या सेटवरील तो फोटो; म्हणाली, ‘हा तर लक्ष्मीबाईंनी…’
2 मृत्यूनंतरही दिशा सालियनचा फोन सुरु होता? ; नेमकं काय आहे प्रकरण
3 सुशांत सिंह मृत्यूप्रकरण : शिबानी दांडेकरने उलगडलं ‘त्या’ मिस्ट्री गर्लचं रहस्य
Just Now!
X