06 August 2020

News Flash

आराध्या, ऐश्वर्या रायही करोना पॉझिटिव्ह, घरामध्येच होणार क्वारंटाइन

चाहत्यांचे मानले आभार

ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन

“पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याचे करोना चाचणीचे रिपोर्ट आले आहेत. दोघींचे करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत”. अभिषेक बच्चनने टि्वटरवरुन रविवारी संध्याकाळी ही माहिती दिली. दुपारी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ऐश्वर्या राय आणि आराध्याचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असे टि्वट केले. नंतर त्यांनी ते टि्वट डिलीट केले.

त्यामुळे ऐश्वर्या आणि आराध्याला करोनाची लागण झाली कि, नाही याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पण संध्याकाळी अभिषेक बच्चनने टि्वट करुन दोघींनी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार नाही. “त्या घरीच होम क्वारंटाइनमध्ये राहणार आहेत. मुंबई महापालिकेने सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली असून ते आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत” असे अभिषेक बच्चनने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. माझी आई जया बच्चन आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचेही अभिषेकने सांगितले. लवकरात लवकर बरे होण्यासाठी चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्याने आभार मानले आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 8:35 pm

Web Title: aishwarya and aaradhya coronavirus positive in home quarantine dmp 82
Next Stories
1 छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकीला दिग्दर्शकाने सुनावले खडेबोल
2 महापालिकेने बच्चन कुटुंबाचे चारही बंगले केले सील, चाचणीसाठी कर्मचाऱ्यांची बनवली यादी
3 ‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्या रायसोबत काम केलेल्या अभिनेत्याचं निधन
Just Now!
X