बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलने नुकताच मनिष पॉलच्या ‘मूव्ही मस्ती’ या शोला हजेरी लावली. दरम्यान दोघेही मस्ती करताना दिसत होते. सुरुवातीला मनिष पॉल काजोलसोबत फ्लर्ट करताना दिसतो. ते पाहून अजयला राग येतो आणि त्याने मनिषला घाबरवायला हातात बंदूक घेतली असल्याचे दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मनिष आणि काजोल ‘कभी खूशी कभी गम’ या चित्रपटातील ‘सूरज हुआ मध्धम’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. काजोल आणि मनिषचा डान्स पाहून सिंघमला राग येतो आणि तो मनिषला घाबरवण्यासाठी खोटी बंदूक हातात घेतो. ते पाहून मनिष घाबरतो आणि काजोलपासून लांब निघून जातो. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच मनिष पॉलचा ‘मूव्ही मस्ती विथ मनिष पॉल’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावत असतात. दरम्यान ते शोमध्ये धम्माल करतानाही दिसतात. यावेळी अजय देवगण आणि काजोल यांनी शोला हजेरी लावली होती. दरम्यान त्यांनीही शोमध्ये मज्जा मस्ती केली असल्याचे दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 3, 2019 5:54 pm