01 March 2021

News Flash

अजय देवगण गुरूग्राममध्ये उभारणार पाच स्क्रीनचं मल्टीप्लेक्स

हा सिनेमा हॉल इतर सिनेमा हॉलपेक्षा वेगळा असणार आहे

तब्बल दोन दशके बॉलिवूडवर अधिराज्य गाजविणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण. अजयने त्याच्या अभिनयाने लाखोंना भूरळ पाडली आहे. प्रत्येक गावात, शहरामध्ये चित्रपटगृह असणे गरजेचे आहे असे अजयला वाटते. त्यासाठीच अजय देवगण प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे. त्याने नुकताच त्याच्या ‘एनवाय सिनेमा’चा करार इलान ग्रुपसह केला आहे. या कराराअंतर्गत अजय देवगण गुरुग्राम येथे पाच नवे मल्टीप्लेक्स उभारणार आहे.

बुधवारी दिल्लीमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुरुग्राम या मॉलमध्ये त्याच्या ‘एनवाय सिनेमा’चे मल्टीप्लेक्स उभारणार असल्याचे सांगितले आहे. हा सिनेमा हॉल इतर सिनेमा हॉलपेक्षा वेगळा असल्याचे अजयने सांगितले. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. तसेच एपिक मॉलमध्ये नव्या पाच स्क्रीन सुरु होणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

‘एनवाय सिनेमा’च्या माध्यमातून छोट्या छोट्या शहरांमध्ये सिनेमा हॉल उभे करणार असल्याचे त्याने सांगितले. संपूर्ण देशभरात ‘एनवाय सिनेमा’च्या फक्त १५ स्क्रिन उपलब्ध आहेत. येत्या चार- पाच वर्षांत या स्क्रिन वाढवून २५० करण्याचा प्रयत्न ‘एनवाय सिनेमा’ करणार आहे. ‘अजय देवगणच्या एनवाय ग्रुपसह करार करणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. या प्रोजेक्टसाठी अजय देवगण ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हे सिनेमागृह अत्यंत सुंदर आहे’ असे एलान ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रविश कपूर यांनी म्हटले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 1:51 pm

Web Title: ajay devgns 5 screen multiplex in gurugram
Next Stories
1 करणसिंह ग्रोवरची ‘कसौटी जिंदगी की २’ मध्ये एण्ट्री, साकारणार ही महत्वपूर्ण भूमिका
2 ज्योतिबाच्या चरणी शिवा-सिद्धीच्या नव्या नात्याची सुरुवात ?
3 अजय देवगणचा ‘ दे दे प्यार दे’ सेन्सॉरच्या कात्रीत
Just Now!
X