26 November 2020

News Flash

या दिवशी प्रदर्शित होणार अक्षयचा ‘Into The Wild’मधील एपिसोड

नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘Into The Wild’ हा शो अतिशय लोकप्रिय आहे. बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याला बेअर ग्रिल्ससोबत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच अक्षयने त्याचा एपिसोड कधी प्रदर्शित होणार याबाबत माहिती दिली आहे.

अक्षयने ट्विट करत ‘Into The Wild’चा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये अक्षय आणि बेअर गिल्स जंगलात फिरताना दिसत आहेत. तसेच १० दिवसांनंतर म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी एपिसोड प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.

अक्षय हा बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यांच्या यादीमधील एक आहे. त्याचे वर्कआऊट व्हिडीओ नेहमी चर्चेत असतात. तसेच तो बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे इंटू द वाइल्ड या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत अक्षयला पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘Into The Wild’ या शोमध्ये सहभागी होणारा अक्षय कुमार तिसरा भारतीय आहे. सर्वात पहिले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत हे सहभागी झाले. कर्नाटकातील बंदिपूर राष्ट्रीय उद्यानात रजनीकांत यांचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या शोमधील एपिसोडचे चित्रीकरण करण्यात आला होता. आता अक्षय कुमार शोमध्ये पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 11:49 am

Web Title: akshay kumar into the wild with bear grylls show trailer and release date avb 95
Next Stories
1 Video : ‘अजुनी’मधून उलगडणार परग्रहवासीयाची प्रेमकथा
2 पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे.. ‘बिग बॉस मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 सुशांतच्या आजारपणाविषयी बहिणीला होती कल्पना?
Just Now!
X