News Flash

विरोधानंतर अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चं नाव बदललं, आता असेल…

विरोधानंतर अक्षयचा 'लक्ष्मी बॉम्ब' नव्या नावानं होणार प्रदर्शित

अभिनेता अक्षय कुमार याच्या बहुचर्चित ठरलेल्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या नावात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाच्या नावावरुन वाद सुरु होता. मात्र, आता या चित्रपटाचं नाव बदलून ‘लक्ष्मी’ इतकंच ठेवण्यात आलं आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर करणी सेनेने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावर आक्षेप घेत विरोध केला होता. तसंच श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. चित्रपट निर्मात्यांनी जाणूनबुजून ‘लक्ष्मी’ हे नाव शीर्षकात वापरल्याचा उल्लेख या नोटिशीत केला होता. हिंदू धर्मातील देवदेवतांचा अपमान केल्यामुळे भावना दुखाविल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं . त्याचप्रमाणे या नावात बदल करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

करणी सेनेने विरोध दर्शविल्यानंतर चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाचं नाव बदललं आहे. चित्रपटाच्या नावातील बॉम्ब हा शब्द हटवत. आता केवळ ‘लक्ष्मी’ असं नाव ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान,‘बॉम्ब’ या चित्रपटात अक्षय कुमार व कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाची तारीख इतक्या जवळ असताना आता निर्माते शीर्षक बदलतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 4:23 pm

Web Title: akshay kumar movie laxmmi bomb name change ssj 93
Next Stories
1 Big Boss 14: जॅस्मिनने राहुलच्या अंगावर फेकले पाणी, नेटकऱ्यांनी सुनावले
2 शाहरुखचा ‘पठाण’ पुढच्या दिवाळीला होणार रिलीज?
3 ब्रॅड पीटने लग्नाचं अमिष दाखवून फसवलं; महिलेने दाखल केली तक्रार
Just Now!
X