01 March 2021

News Flash

अक्षय कुमारचा इंटरनेटवर धुमाकूळ; ‘या’ युट्यूब व्हिडीओला मिळाले ९० कोटी व्ह्यूज

नुपुरसोबत अक्षयची सुंदर केमिस्ट्री; व्हिडीओवर होतोय व्ह्यूजचा वर्षाव

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. चित्रपटांसोबतच तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजमुळे देखील चर्चेत असतो. अक्षयचा असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फिलहाल’ या गाण्याचा आहे. लक्षवेधी बाब म्हणजे वर्षभरात या गाण्याला ९० कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘फिलहाल’ हे गाणं पंजाबी गायक बी प्राक यानं गायलं आहे. अन् त्यानेच या गाण्याचं दिग्दर्शन देखील केलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून अक्षयने म्यूझिक व्हिडीओच्या क्षेत्रातही पदार्पण केलं होतं. या व्हिडीओमध्ये अक्षयसोबत क्रिती सेननची लहान बहिण नुपूर दिसत आहे. या गाण्यात दोघांचीही खूप सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. संगीतकारानं दोन प्रेमींची अर्धवट राहिलेली प्रेमकथा या गाण्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेलं हे गाणं आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. अन् या गाण्याला युट्यूबवर तब्बल ९० कोटी ८ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 7:13 pm

Web Title: akshay kumar nupur sanon filhall song video mppg 94
Next Stories
1 बिग बॉस: “पुरुषांना कोपऱ्यात नेणं थांबव”; काम्या पंजाबी राखीवर संतापली
2 सलमान आणि अजय आमने-सामने! एकाच दिवशी होणार बिग बजेट चित्रपटांची टक्कर
3 चला हवा येऊद्याच्या मंचावर ‘देवमाणूस’ची चर्चा; सरु आजींनी केला रॉकिंग परफॉर्मन्स
Just Now!
X