28 September 2020

News Flash

म्हणून ‘सडक २’ ठरला यूट्यूबवरील सर्वात डिसलाइक मिळणारा ट्रेलर

तसचे डिसलाइकची संख्या वाढत आहे.

चित्रपट निर्माते महेश भट्ट यांचा ‘सडक २’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सडक २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या २४ तासांमध्ये यूट्यूबर सर्वाधिक डिसलाइक मिळालेला हा ट्रेलर ठरला आहे.

‘सडक २’च्या ट्रेलरला ५.२ मिलियन (५२ लाख) डिसलाइक मिळाले आहेत. तसेच ट्रेलरला १ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यातील केवळ २ लाख हे लाइक्स आहेत. हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ‘सडक २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शनाच्या २४ तासांमध्ये यूट्यूबर सर्वाधिक डिसलाइक मिळालेला हा ट्रेलर ठरला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकराणानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा वाद पेटून उठला. त्यामुळे स्टारकिड्सवर जोरदार टीका झाली. यामध्ये सर्वाधिक टीका महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आली होती. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी महेश भट्ट यांचा आगामी चित्रपट ‘सडक २’च्या ट्रेलवर डिसलाइकचा भडिमार केला असल्याचे म्हटले आहे.

‘सडक २’ या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. या चित्रपटाच्या तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रत्येक भूमिकांची ओळख करण्यात आली असून कथेची झलक पाहायला मिळते. या चित्रपटात पूजा भट्ट, आलिया भट्ट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर दिसणार आहेत. संजय दत्तच्या आयुष्यातील सर्वांत प्रिय व्यक्तीचा (पूजा भट्ट) मृत्यू होतो आणि त्यानंतर त्याचा जगण्यातला रस निघून जातो. अशातच त्याच्या आयुष्यात आर्या (आलिया भट्ट) एक नवीन उमेद घेऊन येते. हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 12:08 pm

Web Title: alia bhatts sadak 2 the most disliked trailer on youtube avb 95
Next Stories
1 सुशांतच्या डायरीमधील १५ पानं आली समोर; असे केले होते पैशांचे नियोजन
2 अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग
3 ‘यापुढे कुठल्याही चुकीला माफी नाही’; अभिज्ञा भावेचा इशारा
Just Now!
X