News Flash

‘बिग बॉस 14’ मध्ये होणार अली गोणीची एण्ट्री?

बिग बॉसच्या घरात होणार आणखी एका सदस्याची एण्ट्री

‘बिग बॉस 14’ मध्ये होणार अली गोणीची एण्ट्री?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. यंदाच्या १४ व्या पर्वात छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी या शो सहभागी झाले आहेत. त्यातच आता गेल्या आठवड्यात वाइल्ड कार्डच्या माध्यमातून कविता कौशिक, नैना सिंह आणि शार्दुल पंडित यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या कलाकारांनंतर अभिनेता अली गोणीचीदेखील दमदार एण्ट्री या घरात होणार असल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून अली बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. यात बिग बॉस १४ च्या सुरुवातीपासून अली घरातील सदस्य होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, काही कारणास्तव त्याला ते शक्य झालं नाही. मात्र आता अली या घरात प्रवेश करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, अली बिग बॉसच्या घरात आल्यानंतर घरातलं वातावरण नेमकं कसं होणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून एमटी व्ही ‘स्पिल्ट्स व्हिला’,’ये है मोहबत्ते’, ‘नागीण’, ‘खतरो के खिलाडी’, ‘खतरा खतरा खतरा’ अशा अनेक मालिका त्याच्या गाजल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 10:56 am

Web Title: aly goni is all set to enter bigg boss 14 house report dcp 98
Next Stories
1 अग्गंबाई सासूबाई : अखेर आसावरी बबड्याला घराबाहेर हाकलणार
2 Video : …म्हणून नेहा-रोहनप्रीतच्या लग्नातला ‘हा’ केक ठरला खास
3 अदितीने घेतला धसका! म्हणाली ‘कधीच त्याविषयी गुगल सर्च करणार नाही’
Just Now!
X