22 September 2020

News Flash

‘पीएम नरेंद्र मोदी’सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, जावेद अख्तर म्हणतात…

एकही गाणं न लिहिता श्रेयनामावलीत नाव आल्यानं जावेद अख्तर यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा येतो आहे. यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा प्रदर्शित करू नये अशी मागणी काँग्रेसने केली असतानाच या सिनेमासंदर्भात एक नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या श्रेय नामावलीत गीतकार म्हणून जावेद अख्तर यांचे नाव आहे. मात्र आपण या सिनेमासाठी एकही गाणे लिहिलेले नाही असे ट्विट खुद्द जावेद अख्तर यांनीच केले आहे.

सिनेमाच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर, समीर आणि प्रसून जोशी अशा तिघांची नावं गीतकार म्हणून लिहिण्यात आली आहेत. मात्र माझं नाव श्रेय नामावलीत आलंच कसं? असा प्रश्न जावेद अख्तर यांनी विचारला आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त करत जावेद अख्तर यांनी श्रेयनामावलीच ट्विट केली आहे.

पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. एकीकडे काँग्रेसने या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तोच दुसरीकडे आता गीतकार म्हणून आपले नाव कसे काय? असा प्रश्न खुद्द जावेद अख्तर यांनीच विचारला आहे. त्यामुळे रिलिज होण्याआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे हे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 8:53 pm

Web Title: am shocked to find my name on the poster of this film have not written any songs for it says javed akhtar
Next Stories
1 देशात भाजप- काँग्रेस अपयशी, प्रकाश राज यांची टीका
2 विकी कौशलच्या डोक्यात यशाची हवा, दिग्दर्शकाचा टोमणा
3 #ShameOnKaranJohar :.. म्हणून करण जोहरवर भडकले नेटकरी
Just Now!
X