News Flash

करोनाग्रस्तांसाठी बिग बी म्हणाले, “ज्यांना करोना झालाय ते…..”

बिग बींचं ट्विट वेगानं होतंय व्हायरल

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोकांचं जगणं अवघड झालं आहे. आतापर्यंत या करोनामुळे हजारो लोकांचा जीव गेला आहे. त्याचप्रमाणे करोनाने संक्रमित होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील कमी होताना दिसून येत नाही. अशा परिस्थितीत देशाची आरोग्य यंत्रणा देखील कोलमडून पडली आहे. अनेक रूग्णालयात आजही ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे.

करोनाशी सामना करत असलेल्या लोकांसाठी आता बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रार्थना केली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांनी ही प्रार्थना केली आहे. बिग बी सध्या त्यांच्या सोशम मीडियावर अकाऊंटवर बरेच सक्रिय असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खास फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असतात. सध्याच्या परिस्थितीत जे करोनाशी लढा देत आहेत, अशा लोकांसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटर अकाऊंटवरून प्रार्थना केली आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या या ट्विटमध्ये लिहिलं, “जे करोनाग्रस्त आहेत, ते लवकरात लवकर यातून बरे होवोत यासाठी मी प्रार्थना करतो…जे करोनामुक्त झाले आहेत किंवा होत आहेत अशा सर्वांसाठी देखील मी प्रार्थना करतो…तुम्ही सुरक्षित रहा, नियमांचं पालन करा..”. बिग बी अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतंय. बिग बींच्या चाहत्यांनी त्यांच्या या ट्विटवर कमेंट्स करत तुफान प्रतिसाद दिलाय.

Next Stories
1 आयुष्यमान खुरानाच्या पत्नीने पहिल्यांदा शेअर केला ‘असा’ व्हिडीओ, म्हणाली “हे दु:ख मी कधीही..”
2 ‘नामकरण’मधील अभिनेता झैन इमामच्या भावाचे करोनाने निधन
3 ‘दृश्यम-2’चे निर्माते कुमार मंगत यांच्यावर खटला दाखल; हिंदी रिमेकआधीच नवा वाद
Just Now!
X