06 December 2019

News Flash

-३ डिग्रीमध्ये बिग बी करतायेत काम; फोटो बघून तुम्हीही द्याल दाद

बिग बींची कामाप्रतीची निष्ठा साऱ्यांनाच ठावूक आहे

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांच्याकडे बॉलिवूडमधील एक यशस्वी कलाकार म्हणून पाहिलं जातं. वयाची ७० ओलांडल्यानंतरही ते बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. लवकरच ते ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. सध्या या चित्रपटाचं मनालीमध्ये चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो बिग बींनी शेअर केला असून ते मायनस ३ डिग्रीमध्ये काम करत असल्याचं दिसत आहे.

बिग बींची कामाप्रतीची निष्ठा साऱ्यांनाच ठावूक आहे. आजही ते तितक्याच आवडीने आणि मन लावून काम करतात. विशेष म्हणजे या वयातही ते चक्क मायनस ३डिग्रीमध्ये काम करत आहेत. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करुन ही माहिती दिली.

शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी चेक्सचा शर्ट, काळ्या रंगाचं जॅकेट आणि सनग्लासेस लावले आहेत. तसंच त्यांच्यासोबत अभिनेता रणबीर कपूरदेखील आहे. “-३ डिग्री आणि काम करण्याची पद्धत”, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. सध्या बिग बी मनालीमध्ये त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं चित्रीकरण करत आहेत.

वाचा : सिल्क स्मिताचे कधीही न पाहिलेले फोटो

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बिग बींच्या आरोग्यविषयक तक्रारी सुरु आहेत. त्यामुळे डॉक्टरांनीही त्यांना काम न करण्याची आणि जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला दिला होता. इतकंच नाही तर बिग बींनी देखील आता निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सध्या ते ‘ब्रह्मास्त्र’मध्ये व्यस्त असून या व्यतिरिक्त ते ‘गुलाबो सिताबो’,’चेहरे’ या चित्रपटातही झळकणार आहेत.

First Published on December 2, 2019 11:15 am

Web Title: amitabh bachchan shares a stylish picture with ranbir kapoor working in minus 3 degree ssj 93
Just Now!
X