28 November 2020

News Flash

नागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन?

या चित्रपटासाठी बिग बी फारच उत्साही..

अमिताभ बच्चन, नागराज मंजुळे

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आता फारशी काही अंतरं राहिली नाहीयेत ही बाब नाकारता येणार नाही. विविध प्रकारच्या हिंदी आणि मराठी चित्रपटांना त्यांच्या कथानकांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळत आहे. असाच एक चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘सैराट’. रिंकु राजगुरु, आकाश ठोसर आणि सहकलाकारांच्या साथीने साकारलेल्या या चित्रपटाने एक वेगळीच उंची गाठली आहे हे तर आपण सर्वच जाणतो. याच चित्रपटाचे कथानक सध्या विविध भाषांमध्ये पुनरुज्जिवित केले जात आहे. हिंदीतही या चित्रपटाचा रिमेक होणार असल्याच्या चर्चा सध्या जोरावर आहेत.

‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे एका हिंदी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहेत. नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट नेमका कोणता आहे यावरुन अद्यापही पडदा उठला नसला तरीही चर्चा अशाही रंगत आहेत की, ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन नागराज मंजुळेच करणार आहे. करण जोहरची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच्या संहितेवर सध्या काम सुरु असून या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन पहिल्याच वेळेस एकत्र काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. डीएनए ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आगामी चित्रपटासाठीची संहिता नागराज मंजुळेने अमिताभ बच्चन यांना ऐकवली असून ते या चित्रपटासाठी फारच उत्साही असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात नागराज मंजुळे आणि बिग बी एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी कोणत्या चित्रपटाचा नजराणा सादर करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाचा: मुलाचा जन्म झाल्यावर अमिताभ यांनी नर्सला पाजली होती शॅम्पेन

दरम्यान, बिग बी नेहमीच नव्या जोमाच्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे सरसावत असतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी ‘सैराट’ हा चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया फेसबुक अकाऊंटद्वारे सर्वांसमोर मांडल्या होत्या. ‘सैराट’ चित्रपटाचा एक फोटो पोस्ट करत बिग बींनी ‘मी सैराट हा मराठी चित्रपट पाहिला. अद्भुत…अगदी सोप्या पद्धतीने या चित्रपटातून किती साऱ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत’, असे कॅप्शनही लिहिले होते. त्यामुळे ‘सैराट’ची जादू आजही कायम आहे असेच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 11:59 am

Web Title: amitabh bachchan to star in sairat director nagraj manjules next
Next Stories
1 तैमुरचे डायपरही सैफ बदलतो- करिना कपूर
2 Haseena first look : श्रद्धाच्या ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ चा पहिला पोस्टर
3 या महिन्यात पाहता येणार बहुविध चित्रपटांचा नजराणा
Just Now!
X