विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं हे गाणं एक प्रेमगीत असून ‘ये नैना डरे डरे’ असं या गाण्याचं शिर्षक आहे. अमृता यांनीच रविवारी या गाण्याची लिंक आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन शेअर केलीय.

नक्की वाचा >>  Budget 2021: “आहो मामी… ज्यांना फोटोचं स्पेलिंग येत नाही ते…”; अमृता फडणवीस ‘त्या’ वक्तव्यामुळे झाल्या ट्रोल

खूप साऱ्या गुलाबांची फुलं देत तुमच्यासमोर सादर करत आहे ये नैना डरे डरे. हे गाणं सारेगामा ग्लोबलची निर्मिती आहे. हे रोमॅन्टीक गाणं असलं तरी मी या गाण्यामध्ये स्वत:चीच व्हॅलेंटाइन असल्याप्रमाणे एन्जॉय केलं. हा अनुभव खूप छान होता, असं ट्विट करत अमृता यांनी हे गाणं शेअर केलं आहे.

हे गाणं प्रदर्शित होण्याच्या तीन दिवस आधीच अमृता यांनी गाण्यामधील आपल्या लूकचे फोटो शेअर करत नवीन गाण्यासंदर्भातील माहिती दिली होती. प्रेम हे जादूच्या सर्वात जवळची गोष्ट आहे. लवकरच आम्ही तुमच्यासाठी नवीन गाणं घेऊन येत आहोत, असं या टीझर ट्विटमध्ये अमृता यांनी म्हटलं होतं.

नक्की वाचा >> गाण्यावरील ट्रोलिंग आणि टीका वाचून निराश व्हायला होतं का?; अमृता फडणवीस म्हणतात…

अमृता यांच्या या नवीन गाण्याला दोन दिवसामध्ये ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी युट्यूबवरील या व्हिडीओखाली कमेंट सेक्शनमध्ये अमृता यांना ट्रोल केलं आहे. या व्हिडीओवरील डिसलाइकचा पर्याय सुरु करुन द्यावा अशी मागणी काहींनी केली आहे. तर काहींनी अमृता यांच्या नवीन लूकचं कौतुक केलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

नक्की वाचा >> ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं; ऑनलाइन याचिका