अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अंकिता बऱ्याच वेळा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते. पण नुकताच शेअर केलेल्या फोटोमुळे अंकिता ट्रोल झाली आहे.
अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अंकिता स्विमिंग पूलमध्ये असून तिने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सुशांतच्या चाहत्यांनी तर तिला ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
एक युजर म्हणाला, “सुशांतच्या नावावर खूप प्रसिद्धी मिळवत आहेस.” दुसरा युजर म्हणाला, “तुझ्याकडे इन्स्टापोस्ट करण्याशिवाय दुसरं काही काम नाही.” “थोडी तर लाज वाटू दे” असे एक म्हणाला. अंकिता बॉयफ्रेंड विकी जैनसोबत शिमलामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथे सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे अनेक फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 3:59 pm