News Flash

Koo अ‍ॅपवर अनुपम खेर यांचे १ मिलियन फॉलोअर्स; बॉलिवूड बाहेरही कडक रेकॉर्ड

कवितेच्या अंदाजात चाहत्यांचे मानले आभार

अभिनेते अनुपम खेर हे त्यांच्या अभिनयाप्रमाणेच आजुबाजुला घडणाऱ्या घटनांवर वेगवगळी मतं व्यक्त करण्यासाठी देखील ओळखले जातात. अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय असतात. ते त्यांच्या फॅन्ससोबत बॉण्डिंग ठेवण्यासाठीची कोणतीच संधी सोडत नाहीत. क्वचितंच असा एखादा प्लॅटफॉर्म असेल ज्यावर अभिनेते अनुपम खेर सक्रिय नसतील. ट्विटर, इन्स्टाग्राम पाठोपाठ आता अभिनेते अनुपम खैन हे कू अ‍ॅपवर सुद्धा सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.

काही तासांपूर्वीच अभिनेते अनुपम खेर यांनी हा आकडा पार केलाय. हा आकडा पार करताच अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर स्क्रिनशॉट शेअर करून ही माहिती दिलीय. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत हे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. यात कू अ‍ॅपवर असलेल्या त्यांच्या प्रोफाइलचा स्क्रिनशॉट जोडलाय. कू अ‍ॅपवर १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सेलिब्रेशनला सुरवात केली. अभिनेते अनुपम खेर यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी स्पेशल केक त्यांच्या घरी पाठवला. या केकचे फोटोज देखील त्यांनी या ट्विटमध्ये शेअर केलाय.

 

अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे फोटोज शेअर करताना एक पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये लिहिताना ते म्हणाले, “१०० दिवसांत मी १ मिलियन फॉलोअर्सपर्यंत पोहोचलो आहे…हे फक्त माझ्यासाठीच नाही तर भारत देशाचा आत्मनिर्भर अ‍ॅप कू साठी देखील भारतीयांच्या प्रेमाचं प्रतिक आहे. हा माझ्यासाठी आणि भारत देशाच्या कू अ‍ॅपसाठी मोठा पाठिंबा आहे. भारतीयांची आमच्यासाठी असलेली आपुलकीची भावना आहे…मी यासाठी कू अ‍ॅपच्या टीमचं अभिनंदन करतो…विशेषतः अप्रमेय और मयंक यांचं…ज्यांनी त्यांच्या कू अ‍ॅपने भारत देशाचा गौरव केला. कू अ‍ॅपवर असंच नेहमी बोलत राहू, अशी आशा करतो.”

कू अ‍ॅपवर १ मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्याबद्दल अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या खास कवितेच्या अंदाजात चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या कू अ‍ॅपवर त्यांनी कवितेच्या काही ओळी शेअर करत त्यांचा आनंद चाहत्यांसोबत साजरा केला आहे. यात त्यांनी लिहिलंय, “बस इतनी सी बात पर हमारा परिचय तमाम होता है, हम उस रस्ते नहीं जाते जो रास्ता आम होता है.”

Anupam kher share poem (Photo: Koo@Anupam Kher)

अनुप खैर यांनी लिहिलेल्या या स्पेशल कवितेवर युजर्सनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊल पाडलाय. कविता शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच हजारो लाइक्स मिळाले असून सध्या ही कविता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. अनेक युजर्स त्यांच्या कवितेचं कौतूक करताना दिसून येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 5:47 pm

Web Title: anupam kher crosses one million followers on koo app prp 93
Next Stories
1 “एवढ्या शिक्षणाचा काय फायदा?”, हिजाब घातल्याने सना खान झाली ट्रोल
2 कॅन्सरचं निदान झाल्यानंतर किरण खेर यांची पहिली झलक, मुलाला म्हणाल्या ‘लग्न कर’
3 ‘उगाच हीरोपंती करु नका’, टायगर-दिशावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांचा इशारा
Just Now!
X