भारतात भक्तीगीतांच्या संदर्भात अनुराधा पौडवाल यांचं नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. मात्र त्यांनी भजनं मोठ्या प्रमाणावर गायली असून रसिकांना, भक्तांना ही गाणी पसंतही पडली आहेत. नुकतंच त्यांनी भगवान शंकरांची नावं असलेलं भजन गायलं होतं. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अनुराधा यांनी नुकतीच आजतकला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याबद्दलही सांगितलं आहे आणि त्यांच्या आजवरच्या प्रवासादरम्यानचे काही प्रसंग, आठवणीही शेअर केल्या आहेत.

त्या म्हणतात, “मी एकदा संगीत दिग्दर्शक डिजे शेजवूडला म्हणाले होते की तुम्ही भक्ती आणि डिजे असं फ्युजन करुन काही नवीन ट्राय करा ज्यामुळे यंगस्टर्सही खूश होतील. आणि आता त्यांनी दोन्ही मिळून एक चांगलं भजन तयार केलं आहे जे प्रेक्षकांना फारच आवडत आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भक्तीगीतांच्या आवडीबद्दल त्या म्हणतात, “मला कायमच भक्तीगीतांबद्दल विशेष आकर्षण आहे. जेव्हा मी लहान होते त्यावेळी मला भक्तीगीते फार आवडायची. पण जेव्हा मी चित्रपटात गायला लागले तेव्हा काही काळ मी भक्तीगीतांपासून लांब होते. १२ वर्षांपर्यंत चित्रपटात गायला लागल्यानंतर मला असं वाटलं की मी देवासाठी काहीच गायले नाही. तेव्हा मी देवीकडे प्रार्थना केली की देवी असं काहीतरी कर की माझं नाव प्रत्येक हिंदू मंदिराशी जोडलं जाईल. आणि खरंच ही देवाचीच कृपा आहे…मी अनेक भक्तीगीतं गाऊ शकले”.