28 November 2020

News Flash

बालकवींच्या ‘श्रावणमासी हर्षमानसी’ कवितेला स्वप्नील बांदोडकरच्या आवाजाचा नवा साज

स्वप्नीलने नव्या अंदाजात सादर केली 'श्रावणमासी हर्षमानसी' कविता

त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांची ‘श्रावणमासी हर्षमानसी’ ही निसर्ग कविता सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकली आहे. मात्र आता श्रावण महिना सुरू झाल्याच्या निमित्ताने सागरिका म्युझिकने ही कविता नव्या रुपात, नव्या चालीत सादर केली आहे. गायक स्वप्नील बांदोडकरने नव्या रुपातलं “श्रावणमासी हर्षमानसी” हे गाणे गायलं आहे. नुकताच या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला.

स्वप्नील बांदोडकरचा ‘ती’ हा नवा अल्बम प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या अल्बममधील ‘कसा चंद्र’ आणि ‘सौरी’ ही गाणी लोकप्रिय ठरत आहेत. त्यातच आता बालकवींची श्रावणमासी ही कविता स्वप्नीलने नव्या अंदाजात सादर केली असून त्यालादेखील प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.
संगीतकार निलेश मोहरीर यांचं संगीत लाभलेल्या या गाण्याला कलांगणच्या बालकलाकारांनी कोरस दिला आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत असून त्याला ५ लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

दरम्यान,स्वप्नील बांदोडकरचा सागरिका म्युझिकसोबत हा पाचवा अल्बम आहे. यापूर्वी त्याने ‘बेधूंद’, ‘तू माझा किनारा’, ‘तुला पाहिले’ हे हिट अल्बम दिले आहेत. त्यातील ‘राधा ही बावरी’, ‘गालावर खळी’, ‘राधा राधा’, ‘मंद मंद अशी’ गाणी सुपरहिट झाली आहेत. त्याचप्रमाणे ‘श्रावणमासी हर्षमानसी’ हे गाणंही श्रोत्यांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 3:31 pm

Web Title: baalkavi shravanmasi harshmanasi swapnil bandodkar video launch on social media ssj 93
Next Stories
1 ‘इंडस्ट्रीमध्ये रियासारखे अनेक लोक ब्लॅकमेल करून…’; नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भावाचं ट्विट
2 विवेक ओबेरॉयच्या चित्रपटातून ही स्टारकिड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
3 Video: कपिल शर्मा शोमध्ये सोनू सूदचे अश्रू अनावर, पाहा नेमकं काय झालं
Just Now!
X