26 October 2020

News Flash

सुशांत मृत्यू प्रकरण: बाबा रामदेव यांनी सुशांतसाठी केला यज्ञ; व्हिडीओ होतोय व्हायरल…

सुशांतला न्याय मिळावा यासाठी बाबा रामदेव यांनी केली प्रार्थना

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन महिने उलटून गेले आहेत. मुंबई पोलीस, बिहार पोलीस अन् आता ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी योगगुरु बाबा रामदेव यांनी एक विशेष यज्ञ केला आहे. या यज्ञाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“मी सुशांतजींच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांच्या वेदना ऐकून माझ्याही मनाचा थरकाप उडाला. आम्ही सर्वजण पतंजलीमध्ये सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहोत. सुशांत आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा हीच इश्वर चरणी प्रार्थना” अशा आशयाचं ट्विट बाबा रामदेव यांनी केलं आहे. शिवाय यज्ञाचा एक व्हिडीओ देखील त्यांनी पोस्ट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. यात रियाने AU नामक व्यक्तीला सर्वाधिक वेळा फोन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी AU हे नाव समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र AU ही रियाच्या जवळची व्यक्ती असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रिया आणि AU मध्ये ६३ फोन कॉल्स झाले. AU ही रियाची फॅमेली फ्रेंड असून तिचं नाव अनन्या उधास आहे. परंतु, रिया आणि अनन्यामध्ये इतक्या वेळा फोन का झाले हे अद्याप स्पष्ट न झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, रियाचे फोन कॉल्स रेकॉर्ड तपासल्यावर तिने महेश भट्ट यांनीदेखील फोन केले होते. तसंच तिने वडिलांना सर्वाधिक फोन केल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 5:31 pm

Web Title: baba ramdev hawan for sushant singh rajput mppg 94
Next Stories
1 सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर करण जोहरची पहिली पोस्ट
2 झी टॉकीजवर रंगणार ‘फत्तेशिकस्त’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
3 तैमुरने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; म्हणाला…
Just Now!
X