बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक मतं मांडते. मात्र यावेळी स्वरा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांमुळे चर्चेत आहे. ओबामा यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओवर स्वराने ट्विट केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – Halloween Night 2020: हे चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका
This man’s swag https://t.co/BcaOoq18OM
— Swara Bhasker (@ReallySwara) November 1, 2020
अवश्य पाहा – KBC मुळे अमिताभ झाले करोडपती; एका एपिसोडचं मानधन पाहून व्हाल थक्क
बराक ओबामा यांनी बास्केट बॉल खेळतानाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. एखाद्या प्रोफेशनल खेळाडूसारखे ते या व्हिडीओमध्ये बास्केटबॉल खेळताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर जगभरातील नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. अगदी स्वरा भास्करला देखील या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. या व्यक्तीचा स्वॅग पाहा असं म्हणत तिने बराक ओबामा यांचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.