बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो नेहमीच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्यात त्याचे कॉमेडी व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. आता रितेशचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याने सकाळी उशिरा उठल्यावर काय होतं ते सांगितलं आहे.
रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केले आहे. तर तो ज्युस पिताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रितेशला विचारते की, “तू सकाळी उशिरा उठलास तर तुला काय खायला मिळते?” तर, उत्तर देत रितेश म्हणतो की, “चप्पल”. ‘शुभ सकाळ’, असं कॅप्शन देत रितेशने तो व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या दोघांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. या दोघांचे एकत्र अनेक कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.